Bigg Boss 17 : अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेला बिग बॉस 17 ह्या शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या सिझनमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन सहभागी झाले आहेत. मात्र या दोघांवर सतत टीका होत असल्याचे दिसत आहे. अनेकदा बिग बॉस कडून अंकिताला स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याची चर्चा रंगते. तसेच सतत एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतचं नाव घेतल्यामुळे चाहत्यांकडून तिला ट्रोलही केले जाते. यावर आता टीव्ही अभिनेत्री रुपाली भोसले हिने देखील अंकिता लोखंडेवर नाराजी व्यक्त केली आहे.
इंस्टाग्रामवर काही स्टोरी शेअर करून रूपालीने तिचे मत मांडले आहे. रूपालीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “वीकेंडच्या वारला मनाराला मोठ्यांचा आदर कर असं नेहमी सांगितलं जातं. पण, इशाचं काय? तिला कधीच काहीच बोललं जात नाही. नील, रिंकू मॅम, ऐश्वर्या या इंटस्ट्रीमधील मोठ्या लोकांशी ती १९ वर्षांची मुलगी नेहमीच उद्धट बोलते. ‘बिग बॉस’ तुम्ही आधीसारखे नाही राहिलात आता पूर्णपणे तुमच्यात बदल झाला आहे.” तिच्या या स्टोरीवर अनेक जण प्रतिक्रिया ही देत आहे.
पुढे तिने म्हंटल की, “अंकिता पहिल्या दिवसापासून तू मी स्ट्राँग, स्वतंत्र आहे, असं म्हणत आहेस. तू प्रत्येक आठवड्यात नॉमिनेशनच्या अगोदर किंवा नंतर सुशांत सिंह राजपूतचं नाव का घेतेस? हा खेळ का खेळतेस? सुशांतच्या चाहत्यांकडून सहानभूती मिळवून वोट मिळवण्यासाठी करतेस का? जर तू म्हणतेस तशी तू आहेस, तर स्वत:ला सिद्ध कर. वोट मिळवण्यासाठी भूतकाळातील गोष्टींची गरज नाही. बिग बॉस’ आम्ही टास्क खेळून एक-एक पॉवर मिळवायचो किंवा टास्क केल्यावरच आम्हाला घरात वापरण्यासाठी महागडं सामान मिळायचं. पण, या घरात सगळ्या सदस्यांना सेव्हन स्टार हॉटेलसारखी वागणूक देण्यात येत आहे.”
पुढे रुपाली म्हणते, “जेव्हा वीकेंड का वारमध्ये सलमानने मुन्नवरला सांगितलं होतं की तू नेहमी माझ्याबरोबर काय झालं हे सांगून काय मिळवण्याचा प्रयत्न करत आहेस? ती गोष्ट घडून गेली आहे. आता रिएलिटी शोमध्ये इथे या गोष्टी करू नकोस…तेव्हा तू खूपच उपहासात्मक हावभाव दिले होते. म्हणजे स्वत:ला केलं तर बिचारी आणि दुसऱ्यांनी केलं तर विक्टिम कार्डचा टॅग…”
रूपाली भोसलेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या रूपाली ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत संजनाची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडूनही मोठी पसंती मिळत आहे.