Sanjtosh Bangar Video – शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर, ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल…’ म्हणत केवळ आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित असलेले शहाजीबाप्पू पाटील घराघरात पोहोचले. या बंडामुळे केवळ आपल्या मतदारसंघात, फार तर फार जिल्ह्यात ओळख असलेले अनेक नेते संपूर्ण राज्यभरात ओळखले जाऊ लागले. या नेत्यांमध्ये संतोष बांगर यांचे नाव देखील घ्यावे लागेल.
मात्र याच संतोष बांगर यांच्यावर आता पुन्हा एकदा नामुष्की ओढवली आहे. यावेळी निमित्त ठरलं आहे हेमंत पाटील यांची उमेदवारी कापण्यात आल्याचं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हेमंत पाटील यांना हिंगोली येथून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र हेमंत पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला असून हिंगोलीतून आता बाबुराव कदम कोहळीकर हे शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. भाजपच्या दबावातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
ठोकून ठोकून म्हणणारे बांगर तोंडावर आपटले! | Sanjtosh Bangar Video
काही दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. एका माध्यम प्रतिनिधीने बांगर यांना हेमंत पाटील यांच्या लोकसभा लढतीबाबत विचारले. यावर बोलताना बांगर यांनी चित्र – विचित्र हालचाली करत, ‘हेमंत पाटील हे २०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून येतील… ठोकून ठोकून… विरोधकाच्या खालून…’ अशी वायफळ बडबड केली होती.
मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आज याच हेमंत पाटील यांचे तिकीट कापल्याने, ‘ठोकून ठोकून’ म्हणणारे संतोष बांगर धाडकन तोंडावर आपटले आहेत.
पहिलीच वेळ नाही… | Sanjtosh Bangar Video
संतोष बांगर यांच्यावर नामुष्की ओढवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर याच संतोष बांगर यांनी निष्ठेच्या आणाभाका घेत उद्धव ठाकरे गटात कायम राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र पुढे ते हीच कथित निष्ठा गुंडाळून ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले.
शिंदे यांच्या गटात गेल्यानंतर संतोष बांगर यांनी असच एक चॅलेंज दिल होत. बाजार समितीच्या निवडणुकीत १७ पैकी १७ जागा निवडून आल्या नाहीत तर मिशी काढणार असल्याचं खुलं आव्हान त्यांनी दिलं होतं. मात्र या निवडणुकीत त्यांच्या केवळ पाचच जागा निवडून आल्या. बांगर यांनी मात्र मिशा काढल्या नाहीत.
आता हेमंत पाटील यांच्या विजयाची आरोळी ठोकणाऱ्या बांगर यांचा पुन्हा एकदा पचका झाला आहे. हेमंत पाटील यांचे लोकसभेचे तिकिटाचा कापण्यात आले आहे. त्यामुळे ठोकून ठोकून म्हणणाऱ्या बांगर यांना तोंडघशी पडावे लागल्याचे चित्र आहे. | Sanjtosh Bangar Video
हे देखील वाचा – ठाकरेंचे विश्वासू, दोनदा आमदार! वाचा कोण आहेत ठाकरेंचे हातकणंगलेचे उमेदवार…