IPL Live Cricket Score, DC vs KKR Indian Premier League 2024 : आज आयपीएल 2024 च्या 16 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होत आहे. दोन्ही संघ विशाखापट्टणम येथे 7.30 वाजता मैदानात उतरतील.
तत्पूर्वी, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, त्यानेही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता, कारण सामना जसजसा पुढे जाईल तसतशी खेळपट्टी संथ होत जाईल.
🚨 Toss 🚨@KKRiders win the toss and elect to bat against @DelhiCapitals
Follow the Match ▶️ https://t.co/SUY68b95dG #TATAIPL | #DCvKKR pic.twitter.com/7ll4fGAK5O
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2024
दरम्यान, दिल्लीने आतापर्यंत तीनपैकी दोन सामने गमावले आहेत. अखेरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवत संघ विजयी मार्गावर परतला आहे. त्याचबरोबर कोलकाताने आत्तापर्यंतचे पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. हे आव्हान दिल्लीसाठी सोपे नाही.