Hatkanangale Loksabha Candidate – भिन्न विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेलं सरकार, त्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, सत्ताबदल अशा स्फोटक राजकीय घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडल्या आहेत. यामुळेच, यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रामध्ये चुरशीच्या होण्याची दाट शक्यता आहे. अशातच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
आज जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. उद्धव ठाकरे यांनी येथून सत्यजित पाटील यांना संधी दिली आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पाटील हे ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले होते. लोकसभेच्या उमेदवारीच्या माध्यमातून त्यांना याचे फळ मिळाल्याचे मानले जात आहे.
तत्पूर्वी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत सामील होतील, त्यांना येथून तिकीट देण्यात येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती होती. मात्र राजू शेट्टी यांनी केवळ महाविकास आघाडीत सामील होऊ नये तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढावी अशी अट घालण्यात आली होती.
ही अट राजू शेट्टी यांना मान्य नसल्याने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा तिहेरी लढत होणार हे स्पष्ट झाले होते. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे धैर्यशील माने हे सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. मागील लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी शेट्टी यांचा पराभव केला होता.
अशातच आता, पाटील यांच्या उमेदवारीमुळे येथे माने विरुद्ध शेट्टी विरुद्ध पाटील अशी तिरंगी लढत होणार आहे.
कोण आहेत सत्यजित पाटील | Hatkanangale Loksabha Candidate
2014 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये तेव्हाच्या शिवसेनेच्या चिन्हावर उल्हास पाटील, सत्यजित पाटील आणि सुजित मिणचेकर हे तीन आमदार निवडून आले, परंतु या तिघांचाही 2019 विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला. या तिघांचीही नावे हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आघाडीवर होती. हे तिघेही फुटीनंतर देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले होते.
आज उद्धव ठाकरे यांनी सत्यजित पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. सत्यजित पाटील हे शाहूवाडी पन्हाळ्याचे माजी आमदार आहेत. २००४ आणि २०१४ अशा दोन वेळेस त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली आहे. २०१९ विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला होता.
सत्यजित पाटील हे यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मशाल या निवडणूक चिन्हावर नशीब आजमावणार आहेत. | Hatkanangale Loksabha Candidate
हे देखील वाचा – पाटलांचा पत्ता कट! ‘ठोकून ठोकून’ चित्रविचित्र हातवारे करणारे बांगर तोंडघशी…