नवी दिल्ली – कथित दिल्ली अबकारी घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आलेले आप नेते खासदार संजय सिंग यांना दिल्ली न्यायालयाने 27 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
संजय सिंह यांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना ही कोठडी सुनावण्यात आली आहे.
ईडीने आरोप केला आहे की संजयसिंह यांनी आता रद्द करण्यात आलेले अबकारी कर धोरण तयार करण्यात आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे काही मद्य उत्पादक, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते यांना आर्थिक लाभ पोहचवला गेला.
या आधी संजयसिह यांनी म्हटले होते की आपल्याला कोणत्या कारणासाठी अटक करण्यात आली याची अधिकृत लेखी माहिती ईडीने आपल्याला दिलेली नाही.
या प्रकरणात आधीच्या एका आरोपपत्रात संजयसिंह यांचे नाव घालण्यात आले होते परंतु आम्ही नजरचुकीने त्यांचे नाव घातले अशी जाहीर कबुली देत ईडीने संजय सिंह यांचे नाव खटल्यातून वगळले होते. परंतु पुन्हा त्यांना याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे.