मुंबई : आरे वसाहत वन म्हणून जाहीर करण्याची तसेच आरेतील मेट्रो-3 प्रकल्पाच्या कारशेसाठी 2646 झाडे हटवण्यास पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने दिलेली मंजुरी अवैध ठरवून रद्द करण्याची पर्यावरणवादींची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे आरेतील मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर शुक्रवारपासून आरेतील वृक्षतोडीला सुरूवात करण्यात आली. यावर ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.
Fixed it. #AareyForest #AareyForest #yutikilledaarey pic.twitter.com/1KFNip1PvB
— टिपरे (@AAbaSpeaks) October 5, 2019
संजय राऊत त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे न्यायदेवतेच्या डोळ्यावर एक कपडा बांधत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तसंच त्यावर आरे हे जंगल नाही असेही नमूद करण्यात आले आहे. या चित्रातून राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.