नगर – स्वस्तिक चौकातील दुकानाचे पत्रे उचकटून आत प्रवेश करुन, चोरट्यांनी 80 हजाराची रोख रक्कम व कोटक महेंद्र बॅंकेचे एटीएम कार्ड पळविले. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हितेश कांतीलाल पटेल (वय-30, रा.गणेश स्वस्तिक चौक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी दि.3 रोजी रात्री 11 नंतर दुकानातील 80 हजाराची रोकड व कोटक महेंद्र बॅंकेचे एटीएम चोरट्यांनी पळविले, असे पटेल यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ हे करत आहेत.