“मी पाकिस्तान क्रिकेट संघाची आई नाही” वीणा मालिकच्या टीकेला सानियाचे परखड उत्तर

मॅंचेस्टर – पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारताकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पाकिस्तान संघावर सर्वच स्तरातून टीका करण्यास सुरूवात झाली आहे. शोएब मलिक हा भारताचा सामना होण्याचे आदल्या दिवशी भारतीय पत्नी सानिया मिर्झाच्या समवेत भोजनासाठी गेला होता. त्यांनी पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंसाठी संघ व्यवस्थापनाने केलेल्या आचारसंहितेचा उल्लंघन केल्याची चर्चा समाज माध्यमावर त्वरीत प्रसारित झाली होती. या जोडप्याप्रमाणे पाकिस्तानच्या खेळाडूंनी बर्गर, पिझ्झा आदी पदार्थांचा आस्वाद घेतला होता. त्यावरही पाकिस्तानच्या प्रसार माध्यमांनी टीका केली होती. याबाबतचे व्हिडिओही प्रसारित झाले आहेत.

या सगळ्या प्रकरणात आता पाकिस्तानची मॉडेल वीणा मलिक हिनं उडी घेतली आहे. वीणानं, ”मला तुमच्यासोबत गेलेल्या मुलांची भीती वाटत आहे. तुम्ही शीशी नाईट क्लबमध्ये तुमच्या मुलांना घेऊन गेलात ? माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही ज्या क्लबमध्ये गेलात तिथं जंक फुड असतं, ते खेळाडूंसाठी योग्य आहे का? तु स्वत: एक आई आणि खेळाडू आहे, तुला हे माहित पाहिजे”, असे ट्विट केले.

यावर व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरुन भडकलेल्या सानियानं, वीणाला मी पाकिस्तान क्रिकेट संघाची आई नाही आहे, अशा शब्दात सुनावले. एवढचे नाही तर सानियानं आपल्या ट्विटवर वरुन, “वीणा, मी माझ्या मुलाला तिकडे घेऊन गेले नव्हते. मी माझ्या कुटुंबियांसोबत कुठे जायचं आणि कुठे नाही, हा निर्णय आमचा आहे. मला माझ्या मुलाची तुमच्या सर्वांपेक्षा जास्त काळजी आहे”. त्यानंतर तिनं खोचकपणे, “मी पाकिस्तान क्रिकेट संघाची आई किंवा शिक्षिका नाही”. भारताविरुद्ध सामना हरल्यानंतर पाकिस्तानच्या चाहत्यांनी क्रिकेटपटूंवर जोरदार टीका केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)