#CWC19 : मला कोणतीही चिंता नाही – कोहली

मॅंचेस्टर – भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर हा दुखापतीमुळे आगामी दोन-तीन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याच्या डाव्या पायास दुखापत झाली होती, असं असल तरी भारतीय संघास आणि मला याबदल चिंता नाही असे विराट कोहलीने म्हटले आहे.

पुढे बोलताना विराट कोहली म्हणाला की, भुवनेश्‍वरची उणीव भरून काढण्याची क्षमता शमी याच्याकडे आहे. शमी याने यापूर्वी आम्हाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. येथे सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी तो उत्सुक झाला आहे. कुलदीप याला सूर सापडला आहे. ही माझ्यासाठी आणि संघासाठी आनंददायी गोष्ट आहे. त्याच्या गोलंदाजीवर आक्रमक खेळ करण्याचा पाकिस्तानच्या फलंदाजांनी प्रयत्न केला. मात्र त्याने अचूक टप्प्यावर मारा करीत त्यांचे डावपेच हाणून पाडले. त्याने बाबर आझम याची विकेट घेत पाकिस्तानला मोठा धक्का दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.