सांगली – डुकरांच्या बंदोबस्तासाठी शेतीला केलेल्या तारेच्या कुंपनाला शाॅक लागून मायलेकीचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जाडरबोंबलाद येथे घडली. सुवर्णा परसाप्पा हेळवार (वय- 50) आणि विद्या संजय हेळवार (वय- 25) या दोघी मायलेकीचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद उमदी पोलिसांत झाली आहे.
जाडरबोंबलाद येथील गावाजवळ राहणारे शेतकरी आय एम पाटील यांनी गावाशेजारील जमिनीला डुकराची वर्दळ होऊ नये, म्हणून शेताच्या कडेला बायडींग तारेचे कुंपण केले होते. विद्या हेळवार यांना तारेच्या कुंपनाची माहिती नव्हती. त्या लघुशंकेसाठी शेतीच्या बांधावर आल्या असता त्यांना तारेचा शाॅक लागला. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकूण आई सुवर्णा तेथे गेल्या असता त्यांनाही शाॅक लागला. या घटनेत दोघींचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.