वाघोली – हवेली तालुका भाजपच्या अध्यक्षपदी संदीप भोंडवे यांची निवड करण्यात आली असून राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
याप्रसंगी माजी मंत्री संजय भेगडे, आमदार महेश लांडगे,पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष गणेश भेगडे, महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्यकारणी सदस्य रोहिदास उंद्रे, धर्मेंद्र खांडरे,पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, सुदर्शन चौधरी, माजी अध्यक्ष सुनील कांचन, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण नाना काळभोर, पंचायत समिती सदस्य श्याम गावडे,हवेली तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अनिल सातव पाटील, वाघोली भाजप शहराध्यक्ष केतन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
हवेली तालुक्याच्या पूर्व भागात संदीप भोंडवे हे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी अग्रभागी असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी अनेक वेळा पाठपुरावा करण्यात भोंडवे यशस्वी झाले आहेत. पेरणे वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटात तसेच वाघोली जिल्हा परिषद गटात भोंडवे यांच्या निवडीने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भोंडवे यांची निवड झाल्याने तालुक्यात भाजप नव्या घडामोडी घडवून इतिहास रचणार असल्याची भावना जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील यांनी व्यक्त केली आहे.