नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा स्पष्टवक्तेपणा सर्वांनाच परिचयाचा आहे. दोन दिवसांपुर्वी असाच एक व्हिडिओ त्यांचा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. गडकरी भर कार्यक्रमात बोलताना सुद्धा हयगय करत नाहीत. विशेष म्हणजे ते स्वपक्षातील नेत्यांचा सुद्धा अनेक वेळा समाचार घेताना दिसून आले आहे. असाच एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपल्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे.
Interaction with Media at Bundi, Rajasthan. #PragatiKaHighway #DelhiMumbaiExpressway https://t.co/O1M9VgK9QX
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) September 16, 2021
हा किस्सा आहे त्यावेळचा जेव्हा गडकरी यांचे नुकतेच लग्न झाले होते. त्यावेळी त्यांच्या एका रस्त्याच्या बांधकामात सासऱ्याचेच घर आडवे आले. यावेळी गडकरी यांनी नेमकं काय केलं याबाबत मजेशिर किस्सा त्यांनी सांगितला आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, माझे तेव्हा नुकतेच लग्न झाले होते. माझ्या सासऱ्यांचे घर रस्त्याच्या मधोमध येत होते. रामटेकमध्ये ते घर होते. तेव्हा मी पत्नीला कोणतीही कल्पना न देता सासऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालविला आणि रस्त्याचे काम पूर्ण केले. हे सर्व गडकरींनी सांगितले मात्र त्यानंतर घरात काय झाले ते त्यांनी सांगितले नाही.
नितीन गडकरी हे दिल्ली-मुंबई माहामार्गाची निर्माण कार्याची पाहणी केली. हरियाणाच्या सोहनामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा किस्सा सांगितला आहे.