मुंबई – महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती उत्सुक आहेत, पण त्यांना उमेदवारीही द्यायची नाही त्यांना विरोधही करायचा नाही, अशी भूमिका सर्व पक्षांनी घेतल्याचं चित्र आहे. अशातच संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वाकून नमस्कार करतानाचा एक फोटो भावनिक मजकूरांसह पोस्ट केला आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02nXsRTkLNVtaR7tVLxntTuMSRMPMSg9cLxJYStUEMzh5yFmmJfq6REZECqVYVqvoMl&id=100044614891340
संभाजीराजे यांनी फेसबुकवर पोस्ट मध्ये लिहिले, ”महाराज… तुमच्या नजरेतलं #स्वराज्य मला घडवायचंय…मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…” अशी भावनिक पोस्ट संभाजीराजे यांनी केली आहे. यापोस्ट सोबत त्यांनी छत्रपती शिवाजी महारांना नमस्कार करतानाचा एक फोटो सुद्धा टाकला आहे.
दरम्यान, संभाजीराजे यांना शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने त्यांच्या उमेदवारीचा विषय मागे पडला. संभाजीराजे हे अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. अपक्ष म्हणून महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा, अशी संभाजीराजे यांची भूमिका आहे. मात्र त्यांची ही अपेक्षा पुर्ण होत नसल्याचे आता चित्र आहे.