मुंबई – अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत आली आहे. मलायकाने करण जोहरच्या 50 व्या बर्थडे पार्टीमध्ये तिच्या ड्रेसिंगमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या पार्टीमध्ये मलायकाने निऑन ग्रीन ब्लेझर आणि मॅचिंग शॉर्ट्समध्ये कॅरी केले होते. पार्टी थीमनुसार मलायका खूपच होत दिसत असली तरी काही सोशल मीडिया यूजर्सना तिची बोल्ड स्टाइल आवडली नाही. सोशल मीडियावर यूजर्स तिला तिच्या आउटफिटवरून ट्रोल करत आहेत.
View this post on Instagram
बॉलीवूड कॅमेरामन विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्रामवर करणच्या वाढदिवसाच्या पार्टीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये मलायकाचा एक व्हिडिओ आणि फोटोही आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मलायका पार्टी लूक एकदम ओव्हर द टॉप होता.
मलायकाने पार्टीमध्ये निऑन ग्रीन ब्लेझर आणि ब्लिंगी पिंक हील्स, बंडल बॅगसह दिसून आली. मात्र मलायकाचा लूक पाहून ट्रोलर्स म्हणाला,’मलायकाचा ड्रेसिंग सेन्स पार्टीसाठी सर्वात वाईट होता. तर दुसऱ्या एक युजर्सने थर्ड क्लास फॅशन म्हणत तिला ट्रोल केले आहे.
अनेक यूजर्स आहेत जे मलाइकाला तिच्या बोल्ड लूक आणि ड्रेसिंगसाठी ट्रोल करत आहेत. एका युजर्स लिहिले की,’टॉप घालायला विसरली वाटते’ असे असले तरी मलायकाच्या चाहत्यांनी तिच्या या लुकचे कौतुक करत तिच्या या फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.