लखनौ Rajya Sabha elections UP 2024 – लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशात पार पडलेल्या राज्यसभा निवडणूकीत सत्ताधारी भाजपने अखिलेश यादव यांना धक्का दिला आहे. समाजवादी पक्षाच्या आमदारांनी केलेल्या क्रॉस वोटिंगमुळे भाजपचे सर्व आठ उमेदवार विजयी झाले आहे. तर समाजवादी पक्षाच्या तीनपैकी दोन उमेदवार विजयी झाले असून तिसरे उमेदवार आलोक रंजन यांचा पराभव झाला.
सपच्या सात आमदारांनी भाजपला मतदान केले. विशेष म्हणजे, सपलाही एनडीएतील दोन जणांनी क्रॉस वोटिंग केले. उत्तर प्रदेशात झालेल्या १० जागांसाठीच्या निवडणूकीत सपच्या जया बच्चन या सर्वाधिक ४१ मतांनी विजयी ठरल्या, तर लाल जी सुमन यांना ४० मते मिळाली. तसेच भाजपचे के अमर पाल, सुधांशु त्रिवेदी, चौधरी तेजवीर, नवीन जैन, साधना सिंह, संगीता बलवंत, आरपीएन सिंह आणि संजय सेठ हे विजयी ठरले.