Himachal Pradesh । राज्यसभेच्या निवडणुकीपासून हिमाचल प्रदेशमधील राजकारण काही वेगळ्याच वळणावर गेल्याचे दिसून येतंय. कारण राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग करत भाजपाच्या उमेदवाराला मत दिले होते. त्यामुळे अभिषेक मनू सिंघवी यांचा दारुण पराभवाला झाला होता. तर क्रॉस वोटिंग केल्याप्रकरणी हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी काँग्रेसच्या सहा आमदारांना अपात्र ठरवले होते. दरम्यान, याच संधीचा फायदा सध्या भाजपने घेतलाय.
लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आमदारांनी गेल्या आठवड्यात भाजपात प्रवेश केला होता. यानंतर भाजपाकडून सहा आमदारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी? Himachal Pradesh ।
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. यासाठी भाजपाने उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये धर्मशाळामधून सुधीर शर्मा, सुजानपूरमधून राजिंदर राणा, लाहौल स्पीतीमधून रवी ठाकूर, बडसरमधून इंदर दत्त लखनपाल, गगरेटमधून चैतन्य शर्मा, कुतलाहारमधून देवेंद्र भुट्टो यांना तिकीट दिले. या सहा मतदारसंघात १ जून रोजी मतदान होणार आहे.
काँग्रेसचे सरकार कोसळणार ? Himachal Pradesh ।
राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे काँग्रेसला धक्का बसला होता. यानंतर या आमदरांवर कारवाई झाली होती. यानंतर हे आमदार भाजपाकडून पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांना भाजपाने उमेदवारीही दिली. या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार जिंकून आले तर काँग्रेसचे सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागच्या निवडणुकीची आकडेवारी
हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत एकूण ६८ आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला ४० तर भाजपाला २५ जागा मिळाल्या होत्या. तसेच तीन अपक्ष उमेदवार निवडून आले होते. हिमाचल प्रदेशमध्ये बहुमतासाठी ३५ आकडा आहे. त्यामुळे भाजपाने पोटनिवडणुकीत सहा जागा जिंकल्या तरी आकडा ३१ पर्यंत जातो. तर अपक्ष आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभेचे एकूण संख्याबळ ६५ होईल. त्यामुळे बहुमतासाठी ३३ चे संख्याबळ आवश्यक असेल. मात्र, सध्या काँग्रेसकडे ३४ आमदार आहेत.