विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात संभाजी ब्रिगेडनेही उडी घेतली आहे. पक्षाने विधानसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यात 14 उमेदवारांमध्ये ब्रिगेडकडून पुणे जिल्ह्यातील 21 मधील 10 विधानसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
त्यात पुण्यातील पाच विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून त्यात पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर, कसबा, वडगावशेरी तसेच कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
तर शिरूर-हवेली, इंदापूर, भोर आणि बारामती या मतदारसंघाचा समावेश आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे आणि शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ यांनी ही यादी जाहीर केली.
येत्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड काय भूमिका मांडते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.