एकच लक्ष्य : प्रथम पुणे !! एकच ध्यास : कचरामुक्त पुणे !!
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची १५० व्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि रासेयो क्षेत्रीय संचालनालय भारत सरकार आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने संपुर्ण पुणे शहरभर आपण “स्वच्छता ही सेवा“ अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला होता.
“नो सिंगल यूज प्लॅस्टिक”चा नारा देत बुधवारी सकाळी पुणेकरांनी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी एकाच वेळी स्वच्छतेची शपथ घेतली व देशात पुणे नंबर वन करण्याचा निर्धार केला.
तसेच प्रत्येक स्पाॅटचे फोटो, सहभागी संस्था व तेथील संख्या अन् केलेले काम यांची माहिती लगेचच आमच्याकडे घनकचरा व्यवस्थापन विभागकडे पाठवली.