Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने (Samantha Ruth Prabhu) बॉलीवूडमध्येही मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. समांथा कधी तिच्या चित्रपटामुळे तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. याशिवाय सोशल मीडियाद्वारे देखील तिच्या नव्या प्रोजेक्टबाबत अथवा वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती शेअर करत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
समांथा रुथ प्रभू सध्या मलेशियामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर तिने तिचे बिकनी लुक मधील काही फोटो शेअर केले आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात ती वेळ घालवताना दिसत आहे. सध्या समंथाने अभिनयातून ब्रेक घेतला आहे आणि तिच्या मायोसिटिस या आजारावर उपचार सुरू आहेत. समांथानं मेडिटेशन करण्याचे फोटो देखील शेअर केले आहेत. समांथानं स्वत: सोबत वेळ घालवताना शेअर केलेले हे फोटो शेअर करताना ‘हाइएस्ट लव्ह’ असे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
समंथा जिथे मुक्काम करत आहे त्या ठिकाणाची झलकही दाखवण्यात आली आहे, जी पूर्णपणे निसर्गाने वेढलेली आहे. आजूबाजूला फक्त हिरवळ दिसत आहे. येथे शहरात फिरणाऱ्या वाहनांचे प्रदूषण किंवा आवाज नाही. दरम्यान, समंथाने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली होती. लवकरच ती कामाला सुरवात करणार असल्याचे तिने म्हंटले होते. ती हेल्थ पॉडकास्ट घेऊन येत आहे, अशी माहिती तिने दिली होती.
सामंथा विजय देवरकोंडासोबत ‘कुशी’ चित्रपटात दिसली होती. आता ती वरुण धवनसोबत ‘सिटाडेल इंडिया’मध्ये दिसणार आहे. प्रियांका चोप्राच्या वेब सीरिजचा हा हिंदी रिमेक आहे.