Bullet Temple। भारतात वाहनांबाबत लोकांच्या वेगवेगळ्या समजुती आहेत. काही लोक नवीन कार किंवा मोटारसायकल खरेदी करताना प्रथम मंदिरात जातात. असेही बरेच लोक आहेत ज्यांच्या कारच्या डॅशबोर्डवर देवांची प्रतिमा आणि फोटो आहे. अशा अनेक गोष्टी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात पाहिल्या असतील.
पण तुम्ही कधी बुलेट मोटरसायकल मंदिराबद्दल ऐकले आहे का? हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, पण राजस्थानमध्ये असेच एक मंदिर आहे. पाली-जोधपूर महामार्गावरील चोटीला गावात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाजवळ दगडी मचाण बांधण्यात आलीये. येथे बुलेट मोटरसायकल उभी आहे. जोधपूरपासून या मंदिराचे अंतर 53 किलोमीटर आहे.
राजस्थानच्या या बुलेट टेंपलची कहाणी खूप रंजक आणि दुःखद आहे. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील ओम सिंह राठोड यांचा 1991 मध्ये एका भीषण अपघातात, मृत्यू झाला होता. जिथे त्याचा अपघात झाला तिथे ओमचे छोटेसे मंदिर आहे. त्यांच्या फोटोसह एक बुलेटही येथे ठेवण्यात आली आहे. असे मानले जाते की, आजही त्यांचा आत्मा महामार्गावरील अपघातांपासून लोकांचे रक्षण करतो.
मोटारसायकल बेपत्ता झाली
अपघातानंतर पोलिसांनी मोटारसायकल पोलीस ठाण्यात आणली. परंतु रात्री मोटारसायकल त्याच ठिकाणी आली जिथे ओमसिंग राठोड यांचा अपघात झाला होता. यामुळे पोलिसांनाही चांगलेच आश्चर्य वाटले. यानंतर मोटारसायकल पुन्हा पोलिस ठाण्यात आणली आणि यावेळी तिला साखळीने बांधण्यात आले. साखळीने बांधलेली ही मोटारसायकल कुठेही जाऊ शकली नाही, मात्र रात्रीच्या वेळी स्वतःहून सुरू झाली, असे सांगण्यात येते.
मंदिराची ओळख
मंदिराच्या आजूबाजूचे गावकरी ओमसिंह राठोड यांना आपला देव मानतात. मात्र इथले लोकच नाही तर राजस्थानच्या दूरवरचे लोकही इथे येतात आणि बुलेटची पूजा करतात. यासोबतच लोक दुचाकीला नवसाचा लाल धागा बांधतात. येथे त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असे लोक सांगतात.
हेही वाचा
Bollywood : शाहरूख खानच्या लेकीने ‘या’ ठिकाणी खरेदी केली करोडोंची प्रॉपर्टी