नवी दिल्ली – समाजवादी पक्षाचे आमदार सुभाष राय यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ते उत्तरप्रदेशातल जलालपुर मतदार संघातील आमदार आहेत.
प्रदेश भाजप अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राय म्हणाले की मी पुर्वीही भारतीय जनता पक्षात होतो त्यामुळे मी मुळ पक्षात परत येणे ही माझ्यासाठी घरवापसीच आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाचे स्वागत करताना भाजपचे प्रवक्ते अनिल बलुनी यांनी म्हटले आहे की राज्यातील राजकीय हवा भाजपच्याच बाजूने आहे.
ज्यांना विकासाचे राजकारण करून खरा राष्ट्रवाद आणायचा आहे त्यांच्यासाठी भाजप हाच एकमेव पर्याय आहे आणि हे ज्यांना कळले ते पुन्हा भाजपकडे वळत आहेत असे त्यांनी नमूद केले.