Eknath Khadse । मागील काही दिवसांपासून शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपवासी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच खडसेंनी थेट दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. मात्र, केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाने खडसेंना पुन्हा पक्षात घेतांना त्यांच्या समोर एक अट ठेवलीय. विशेष म्हणजे खडसे यांच्यासमोर ठेवण्यात आलेली ही अट शरद पवारांना भारी पडणार आहे. असे सांगण्यात येत आहे.
एकनाथ खडसे मागच्या काही दिवसांपासून भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. याच चर्चांवर आता शिक्कामोर्तब झाला आहे. खुद्द एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीला दिलीय. पण, पक्ष प्रवेश करतांना एकनाथ खडसे यांच्यासमोर एक अट ठेवण्यात आली आहे.
आमदारकीचा राजीनामा द्यावा Eknath Khadse ।
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोट्यातून मिळालेल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यानंतरचा भाजपमध्ये सहभागी व्हावं. तसेच त्या बदल्यात एकनाथ खडसे यांच्या आमदारकीच्या जागी रोहिणी खडसे यांची उरलेल्या कालावधीसाठी पाठवणी केली जाणार आहे. यासाठी खडसे यांच्याकडून देखील होकार देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
असा आहे भाजपचा मास्टर प्लॅन…Eknath Khadse ।
विशेष म्हणजे खडसे यांना पक्षात घेतांना भाजपने शरद पवारांना धक्का देण्याचा मास्टर प्लॅन देखील आखला आहे. तर, एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे आमदार आणि त्यांच्या जागी भाजपच्या आमदार म्हणून रोहिणी खडसे कसे जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण, याबाबत देखील भाजपने प्लॅन आखला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या विधानपरिषदेत शरद पवार गटाचे केवळ तीन आमदार असून, यामध्ये एकनाथ खडसे स्वत:, आमदार अरुण अण्णा लाड आणि शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्यास आपोआपच शरद पवार गटाचे विधानपरिषदेतील संख्याबळ कमी होईल. परिणामी ती जागा विधानपरिषदेत मोठ्या संख्येने असणाऱ्या भाजपकडे जाईल. विशेष म्हणजे भाजप रोहिणी खडसे यांची त्याच जागेवर वर्णी लावू इच्छित असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा
एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर नाना पटोलेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले…