Sam Bahadur : अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) ‘सॅम बहादुर’ ( Sam Bahadur ) या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 70 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. मेघना गुलजारच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चरित्रपट रणबीर कपूर स्टारर ‘अॅनिमल’ सोबत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
बॉक्स ऑफिसच्या संघर्षानंतरही हा चित्रपट ‘अॅनिमल’च्या वेगापेक्षा पुढे आहे आणि हळूहळू 100 कोटी क्लबच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसून येत आहे.
विकी कौशलच्या चित्रपटाचे कलेक्शन मागील एका आठवड्यापासून 2 ते 2.5 कोटींपर्यंत मर्यादित होते. मात्र, तिसऱ्या शनिवारी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आणि चित्रपटाने 4.5 कोटींची दमदार कमाई केली.
आता 17 व्या दिवसाचे काही आकडे समोर आले असून त्यानुसार चित्रपटाने आतापर्यंत 2.56 कोटींची कमाई केली आहे. यासह, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 73.91 इतके झाले आहे.
‘सॅम बहादुर’ची स्टारकास्ट
‘सॅम बहादुर’ हा एक चरित्रात्मक चित्रपट आहे ज्यामध्ये विकी कौशलने भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सान्या मल्होत्राने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तर फातिमा सना शेखने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.