नवी दिल्ली – दिल्ली मेट्रोच्या दरवाजात साडी अडकल्याने ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील इंद्रलोक मेट्रो स्टेशनवर रीना नावाच्या महिलेची साडी मेट्रोच्या दरवाजात अडकली. यानंतर फाटक बंद झाले आणि मेट्रो धावू लागली. रीना चालत्या मेट्रोसोबत ओढल्या गेली. त्यानंतर ती रुळावर पडली. त्यानंतर महिलेला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी उपचारा दरम्यान रीना यांचा मृत्यू झाला.
रीना गुरुवारी पश्चिम दिल्लीतील नांगलोई येथून मोहन नगरला जात होत्या. व्हायलेट लाइनच्या इंद्रलोक स्टेशनवर त्या मेट्रोमध्ये चढल्या. इतक्यात त्यांची साडी मेट्रोच्या गेटच्या मधोमध अडकली आणि मेट्रो धावू लागली. मात्र, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) अद्याप याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.
या घटनेनंतर रीना यांना रक्ताने माखलेली पाहून लोकांनी त्यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला, परंतु तीन रुग्णालयांनी त्यांना दाखल करण्यास नकार दिला. लोकनायक रुग्णालयातून परतल्यानंतर दीप चंद बंधू, राम मनोहर लोहिया आणि कुटुंबीयांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले.
रीनाला हॉस्पिटलमध्ये आणले, तेव्हा तिची प्रकृती खूपच खराब होती. डोक्याला फ्रॅक्चर झाले होते. त्यांच्या फुफ्फुसालाही दुखापत झाली होती, त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे, उपचारादरम्यान रीनाचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.