Tiger 3 – मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) ‘टायगर 3’ (Tiger 3) हा चित्रपट अखेर आज रिलीज झाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटात सलमानसह शाहरुख खानच्या कॅमिओची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर टायगर 3 (Tiger 3) या चित्रपटातील शाहरुखच्या कॅमिओचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सलमान खानला शत्रूंपासून वाचवत असल्याचे दिसत आहे. सलमान खान हा दुश्मनांसोबत फाईटिंग करताना शाहरुख हा एक बॉम्ब तिथे टाकतो. त्यावेळी झुमे जो पठाण हे गाणं ऐकू येत आहे. त्यानंतर शाहरुख खानची एन्ट्री होते. सध्या सगळीकडे याच सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे.
पण आता या चित्रपटाबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट रिलीजच्या दिवशीच ऑनलाइन लीक झाला आहे. सलमान खानच्या टायगर 3 ची चाहत्यांमध्ये आधीच खूप क्रेझ होती.
त्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासून चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचा पहिला शो सुरू झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण रिलीज झाल्यानंतर काही तासांतच हा चित्रपट पायरसीचा बळी ठरला आहे.
टायगर 3 अनेक साइट्सवर विनामूल्य डाउनलोड केला जात आहे. Movierulz, Filmyzilla, Kuttymovies, Tamilrockers, Filmywap, Pagalworld, Filmymeet, 7starhd, Vegamovies आणि Moviesflix सारख्या साइटवर उपलब्ध.
सलमान खानने याआधीच चित्रपट लीक न करण्याचे आवाहन केले होते, मात्र असे असतानाही त्याचा चित्रपट रिलीजच्या दिवशीच लीक झाला. आता याचा चित्रपटाच्या कमाईवर किती परिणाम होतो हे पाहायचे महत्वाचे ठरणार आहे.