ICC World Cup 2023 India vs Netherlands Match Live Score : विश्वचषक 2023 च्या 45व्या सामन्यात आज भारताचा सामना नेदरलँडशी होत आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या विश्वचषकात आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाला नेदरलँडविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात ही विजयी मोहीम कायम राखत देशवासीयांना दिवाळीची भेट द्यायची आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे तर नेदरलँड्स (IND vs NED) स्पर्धेतून बाहेर पडला आहे आणि हा त्यांचा शेवटचा सामना आहे.
रोहित, गिल आणि कोहली यांच्या अर्धशतकी खेळीनंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांच्या झंझावती शतकाच्या जोरावर भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चार गडी गमावून 50 षटकात 410 धावा केल्या असून नेदरलँड्ससमोर विजयासाठी 411 धावाचं आव्हान आहे. विश्वचषकातील भारताची ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी भारताने 2007 मध्ये बर्म्युडाविरुद्ध 413 धावा केल्या होत्या.
भारताकडून फलंदाजीत श्रेयस अय्यरने 94 चेंडूत 10 चौकार अन् 5 षटकारासह सर्वाधिक नाबाद 128 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 84 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विश्वचषकातील त्याचे हे पहिलेच शतक आहे. लोकेश राहुल 64 चेंडूत 102 धावा करून बाद झाला.त्याने शानदार खेळी केली आहे. या विश्वचषकातील हे पाचवे जलद शतक आहे. त्याचबरोबर भारतासाठी हे विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक ठरले आहे. राहुलनं आपल्या खेळीत 11 चौकार अन् 4 षटकार लगावले.
Innings Break!
A batting display full of fireworks as centuries from Shreyas Iyer & KL Rahul light up Chinnaswamy 💥#TeamIndia post 410/4 in the first innings 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/efDilI0KZP#CWC23 | #MenInBlue | #INDvNED pic.twitter.com/eYeIDYrJum
— BCCI (@BCCI) November 12, 2023
कर्णधार रोहितने 61 आणि गिल-कोहलीने प्रत्येकी 51 धावांचे योगदान दिले. या सामन्यात भारताच्या पहिल्या पाच फलंदाजांनी 50 हून अधिक धावा केल्या. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी 208 धावांची भागीदारी केली. लोकेश राहुलने 62 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि ते देशासाठी विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक ठरले.
लक्षवेधी….
1. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच भारताच्या पहिल्या 5 फलंदाजांनी केल्या 50 हून अधिक धावा
2. श्रेयस अय्यरचं विश्वचषकातील पहिलेच शतक
3. राहुलचे भारतासाठी विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक
4. विश्वचषकातील भारताची दुसरी सर्वोत्तम धावसंख्या
(2007 मध्ये बर्म्युडाविरुद्ध 413 धावा)
5. विश्वचषकात विराटच्या नावावर सर्वाधिक 594 धावा
(2 शतक आणि 5 अर्धशतक)6. रोहितचं अर्धशतकाचे शतक पूर्ण (टेस्ट 16, टी-20 29 आणि वनडे 55)
(A) सलामीवीर फलंदाज म्हणून रोहितचा 14 हजार धावांचा पल्ला पार
(B) एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार (60)
(C) विश्वकरंडकात सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार
(D) विश्वचषकात दोनदा 500+ धावा करणारा पहिला फलंदाज; रोहितने सचिन तेंडुलकरशी केली बरोबरी ( विश्वचषत 2019 = 648 रन,विश्वचषत 2023 = 503 रन)
(E) विश्वचषकात सर्वाधिक 50+ धावा करणारा तिसरा खेळाडू
नेदरलँड्सकडून गोलंदाजीत बस डी लीडे यानं सर्वाधिक दोन बळी घेतले. त्यानं रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांना बाद केले. मीकरेन आणि मर्व यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.