मुंबई – एकता कपूरच्या ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटाचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये आयुष्मान खुराना आणि सलमान खान यांच्यात संवाद आहे. मात्र, फक्त सलमानचा आवाज ऐकू येतोय. या नव्या प्रोमोमध्ये नमस्कार, मी पूजा आहे. तू कोण आहेस? सलमान म्हणतो- मी बोलतोय. पूजा म्हणते- अरे भाऊ. ईद आली नाही, तू आला.
View this post on Instagram
यावर सलमान म्हणतो,’भाईजान मी इतरांसाठी आहे, तुझ्यासाठी मी फक्त जान आहे. मी अजूनही अविवाहित आहे. तुझ्यामुळे माझं लग्न झालं नाही. यावेळी ईदच्या दिवशी पूजा तू दिसशील असे ऐकले आहे? पूजा सांगते की, जिथे जान असेल तेथे मी. सलमान यावर म्हणतो- चेहरा कधी दाखवतेय ? पूजा म्हणाली,’इकडे बघ, व्हिडिओ कॉल उचल.’ असा या प्रोमोमध्ये सलमान आणि पूजाचा म्हणजे आयुष्यमन खुराणाचा संवाद होतो.
पुढे, पूजाने खिडकी उघडताच तिने आपला चेहरा हाताने लपवला. भाईजानला फक्त दिसेलच इतक्या वेळात लाईट जाते. पूजा म्हणते- आता ईदचा चंद्र बघ. 7 जुलै रोजी माझा चेहरा पहा. सलमान म्हणतो,’महिलांनी मला नेहमीच अंधारात ठेवले आहे, म्हणूनच मी अविवाहित आहे.’ यानंतर ‘ड्रीम गर्ल 2’चे पोस्टर रिलीज होते.
या चित्रपटातील स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, अनन्या पांडे आयुष्मान खुरानासोबत दिसणार आहे. एकता कपूरसोबत शोभा कपूर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. बालाजी टेलिफिल्म्स प्रस्तुत. चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. चित्रपट ‘ड्रीम गर्ल’चा सिक्वेल आहे. यात आयुष्मान खुरानाही होता. मात्र अभिनेत्रीची भूमिका नुसरत भरुचाने केली होती.