मुंबई – दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यांच्या ‘चौक’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा टीझर अनेकांच्या पसंतीस पडत आहे. या चित्रपटात प्रविण तरडे यांची देखील भूमिका असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची रंगत अधिकच वाढू शकते.
या टीझरच्या सुरुवातीला मोठी गर्दी दिसते. गणेशोत्सवानिमित्त होणारी मैत्री, वाद, चर्चा हे सगळे चौकातले विषय असतात. यावरून सामाजिक विषयांवर भाष्य करणारा चौक चित्रपट आहे. या टीझरमधील संवादाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुरुवातीला उपेंद्र लिमये यांचा ‘वाघ आहे वाघ’ तर टीझरच्या शेवटी किरणचा ‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार’ हा संवाद ऐकू येतो. यावरूनच हा चित्रपट दमदार असल्याचा अंदाज येतो.
अभिनेता व दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यांनी लेखन, संवाद, कथा, पटकथा ही सर्वच बाजू उत्तमरित्या निभावली आहे. या चित्रपटात प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, किरण गायकवाड, स्नेहल तरडे, सुरेश विश्वकर्मा, संस्कृती बालगुडे, अक्षय टंकसाळे, शुभंकर एकबोटे, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर असे अनेक कलाकार या चित्रपटात दिसणार आहे. तर ‘चौक’ची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील यांनी केली आहे.
View this post on Instagram
या टीझरमधील पार्श्वसंगीताने देखील अनेकांची मन जिंकली आहे. सध्या या चित्रपटाचा टीझर चांगलाच चर्चेत आला आहे. हा टीझर पाहून आता प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिक वाढली आहे.