मुंबई – बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच, अभिनेता ‘सलमान खान’ त्याच्या फॅन्ससाठी सतत नवनवीन गोष्टी घेऊन येत असतो. असंच काहीसं आजही सलमान एक खास गिफ्ट त्याच्या चाहत्यांसाठी घेऊन आला आहे. त्याच्या चाहत्यांना आपल्या लाडक्या भाई जानच्या अनेक गोष्टी आवडत असतात.
नुकतंच, अभिनेता सलमान खानचं एक नवीन गाणं रिलीज झालं आहे. स्वतः सलमानने हे गाणं आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. ‘डान्स विथ मी..’ असं या गाण्याचं शीर्षक आहे. सलमानचे चाहते या गाण्याला ट्रीट मानून मज्जा घेत आहेत.
‘डान्स विथ मी..’ हे गाणं स्वतः सलमान खानने गायलं असून, व्हिडिओत सलमानचा कूल अंदाज पाहायला मिळत आहे. अतिशय कमी कालावधीत हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुद्धा सलमान खानचं ‘मैं चला….’ हे रोमँटिक गाणं प्रदर्शित झालं होत. या गाण्यात सलमान सोबत अभिनेत्री प्रज्ञा जायसवाल स्क्रीन शेअर करताना दिसली होती.