मुंबई : राज्यातील सुपरमार्केटमधून वाईनची विक्री करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर सरकारच्या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर खोचक शब्दांत टीका केली आहे.
पत्रकरांशी बोलतांना ते म्हणाले,’भाजप नेत्यांची मुलं काय रस्त्यावर केळी विकतात का? अमित शहांचा मुलगा ढोकळा विकतो का? कुणी काय व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आमची एखादी वायनरी असेल तर सोमय्यांनी ती ताब्यात घ्यावी आणि चालवावी. तशी काही वायनरी असेल तर मी त्यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे.
ते पुढे म्हणाले,’बँकांना लुबाडणं, चोऱ्यामाऱ्या करणं यापेक्षा कष्ट करणं, काम करणं, श्रम करणं कधीही चांगलं. भाजपचे थोतांडी लोकं काहीही म्हणत होते.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मला फोन होता, तेही हसत होते. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती काही व्यवसाय करत असेल तर तो काय गुन्हा आहे का?’ असा प्रश्न विचारत राऊत यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे.