मुंबई – बॉलीवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खानने 90 च्या दशकापासून सिनेसृष्टीत स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजही बॉलीवूडमध्ये त्याचा धबधबा कायम आहे. अनेक अभिनेत्री सलमानसोबत काम करण्यासाठी उत्सुक असतात. “बिवी हो तो ऐसी” या चित्रपटातून त्याने 1988 मध्ये बाॅलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर आता सलमानने नुकतेच बॉलीवूडमध्ये 35 वर्ष पूर्ण केले आहेत. याबाबत त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहे.
सलमानने त्याच्या काही फेमस चित्रपटातील सीन एकत्रित करुन आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याखाली त्याने कॅप्शन लिहिले आहे, “35 वर्षे 35 दिवसांसारखी वाटली. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार.” त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, “येथे दुसरा सलमान खान कधीच असू शकत नाही.”
View this post on Instagram
दरम्यान, सलमान खान लवकरच ‘टायगर ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ मुख्यभूमिकेत दिसणार आहे. याशिवाय यात इमरान हाश्मी, विशाल जेठवा आणि रिद्धी डोगराही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. 10 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. विशे म्हणजे या सिनेमात शाहरुख खानची देखील झलक पाहायला मिळणार आहे.