सलमान खान आपल्या आगामी “अंतिम- द फायनल ट्रूथ’चे प्रमोशन करणार नाही, असे समजले आहे. “अंतिम’ हा ऍक्शन थ्रिलर फिल्म 26 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. त्याच्या आठवडाभर आगोदर पासून सिनेमाच्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटीजना सुरुवात होणार आहेत.
मात्र, सलमानने त्यात भाग घ्यायचा नाही, असे ठरवले आहे. या सिनेमाला प्रमोट करण्याची जबाबदारी सलमानने आपल्या फॅन्सवर टाकली आहे. मात्र, त्याच्या या भूमिकेवर ट्विटरवरून जोरदार टीका व्हायला लागली आहे.
मुळातच “अंतिम’ हा सलमानचा सिनेमाच नाही, असे काही फॅन्सनी म्हटले आहे. तर प्रमोशन केल्याबद्दल त्या सिनेमाच्या फायद्यातील काही भाग फॅन्सना मिळेल का? अशी विचारणा काही फॅन्सनी केली आहे. ज्याप्रमाणे अपघातानंतर सगळी जबाबदारी ड्रायव्हरवर ढकलून दिली गेली होती.
त्याचप्रमाणे सलमान खान जबाबदारी झटकतो आहे, अशी टीका सलमानच्या चाहत्यांनी केली. आता सलमानवर करिअर अवलंबून असलेल्या त्याचा मेव्हणा आयुष शर्माचे कसे काय होणार असा प्रश्न सलमानच्या चाहत्यांना पडला आहे.