व्हिडीओ : भडकलेल्या सल्लूने फॅनला दिलेली वागणूक पाहून तुम्हीही म्हणाल ‘भाईजान’ चुकलाच!

मुंबई – ज्या प्रमाणे अभिनेता सलमान खान हा त्याच्या सहृदयी वर्तुणुकीच्या किस्स्यांमुळे प्रसिद्ध आहे अगदी त्याच प्रमाणे तो त्याचा उर्मट वागणुकीमुळे बदनाम देखील आहे. असा हा प्रचंड ‘मुडी’ स्वभाव असलेला सलमान त्याच्या ‘गुड’ किंवा ‘बॅड’ बिहेव्हियरमुळे सदैव माध्यमांच्या प्रकाशझोतात असतो एवढं मात्र नक्की. अशातच आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सलमान खान याच्या एका व्हिडीओमुळे सलमानचं उर्मट रूप त्याच्या चाहत्यांसमोर आलं असून हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याचे डाय-हार्ड चाहतेही सलमानच्या वर्तणुकीचे समर्थन करणार नाहीत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सलमान खान याचा गोवा आंतराष्ट्रीय विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर झळकत असून या व्हिडिओमध्ये सलमानने त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी धडपड करत असलेल्या त्याच्या चाहत्याचा मोबाईल अक्षरशः हिसकावून घेतला आहे. मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर सलमान पुढे चालत येताच त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

सलमानच्या ‘क्र्यु’मधील व्यक्तीचीही अरेरावी

या व्हिडिओमध्ये सलमानच्या मागून चालत येत असलेला त्याच्या ‘क्र्यु’मधील एक व्यक्ती देखील सलमानसोबत सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चाहत्यास धक्काबुक्की करताना दिसत आहे. हिरवा शर्ट परिधान केलेला हा व्यक्ती सलमानने मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर मागून चालत येत अत्यंत हिणकस भावनेने ‘त्या’ चाहत्यास ढकलून देत असल्याची दृश्य या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत.

सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया 

अनेक युवकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या अभिनेता सलमान खानने आपल्याच चाहत्याला अशाप्रकारे वागणूक दिल्याने सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी त्याच्या वर्तुणुकीबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे या ६ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये सलमान जरी आपल्या चाहत्यासोबत उर्मट वर्तणूक करताना दिसत असला तरी संपूर्ण प्रकरण काय आहे? याचा उलगडा होणं गरजेचं असल्याचं मत काही नेटकऱ्यानी व्यक्त केलं आहे.

सेलिब्रिटींच्या डोक्यात हवाच !

केवळ सलमानच नव्हे तर बॉलिवूडच्या अनेक स्टार्सने यापूर्वी देखील चाहत्यांसोबत अशाप्रकारचे उर्मट वर्तन केल्याचे अनेक किस्से आहेत. काही दिवसांपूर्वी इंटरनेट सेन्सेशन राणू मंडल यांचाही एक व्हिडीओ सोशल मीडियावर असाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये मंडल यांनी सेल्फीसाठी विचारणाऱ्या एका फॅनचा पाणउतारा केल्याचं पाहायला मिळालं होत. तर काहीवेळा फॅन्सकडून देखील आपल्या सीमांचे उल्लंघन होत असल्याने स्टार्स आपला ‘टेम्पर लूज’ करताना दिसतात.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here