Javed Akhtar – बॉलिवूडचे दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांनी नुकतीच राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी प्रभू श्रीराम आणि सीता माता हे फक्त हिंदूंचे दैवत नाही असं विधान केलं. ते म्हणाले,’ प्रभू श्रीराम आणि सीता केवळ हिंदू देव देवता नाही. ही भारतीय संस्कृती आहे. मी नास्तिक आहे पण तरी मी प्रभू श्रीराम आणि सीतेला आपल्या देशाची संपत्ती मानतो म्हणूनच आज मी इथे आहे. जेव्हा आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो तेव्हा राम आणि सीताच आठवतात.जय सियाराम.’ सध्या या दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गणेश गल्ली, लालबाग (शिवडी विधानसभा) येथे आज धनत्रयोदशीच्या शुभदिनी मोठ्या उत्साहात “नमो उत्सव” साजरा करण्यात आला. ज्येष्ठ गायिका उत्तराताई केळकर यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. मराठी माणसाच्या सुखा-समाधानाचे प्रसंग वृद्धिंगत व्हावेत, म्हणूनच भाजपा मुंबईने या आगळ्यावेगळ्या… pic.twitter.com/M5Nkbg2Yxj
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 10, 2023
यावरून आता भाजप नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. भाजप नेते आशिष शेलार म्हणाले,’ दीपोत्सवाचे आयोजन कुठल्याही पक्षाने करावे. ते स्वागतार्ह आहे. कलाकाराला जात, धर्म, भाषा नसते. पण, गुरूवारी सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत एक उद्घाटन झालं. आम्ही गायक उत्तरा केळकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन करतोय. आता मराठीचा प्रश्न कुणी कुणाला विचारायचा?’ असा प्रश्न विचारला आहे. मराठीच्या प्रश्नावरून भाजप मनसेत आता वाद सुरु झाला आहे.
आशिष शेलार पुढे म्हणाले,’दीपोत्सव करणाऱ्यांनी सलीम खान आणि जावेद अख्तर यांना घेऊन टिमकी वाजवून घेतली. पण, आमचे मराठी कलाकार छोटे नाहीत. मराठी कलाकारांच्या उपस्थितीत दीपोत्सव झाला पाहिजे, ही भाजपाची संकल्पना आहे. आम्हीही एखाद्या कार्यक्रमाला सलीम खान आणि जावेद अख्तर यांना बोलवू. पण, तो कार्यक्रम दीपावलीचा नसेल’ असेही ते म्हणाले आहे.