pawar family get together : दरवर्षी पुण्यात संपूर्ण पवार कुटुंबीयांची एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात. यंदा मात्र सर्व कुटुंब एकत्र येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण पुण्यात प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवार संपूर्ण कुटुंबीयांसह दिवाळीनिमित्त एकत्र जमा झाले आले. यावेळी शरद पवारांनी (Sharad Pawar) सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. याविषयी बोलताना “माणसाच्या आयुष्यात चढ उतार असतात, अडचणी असतात वेळप्रसंगी अडचणींना तोंड द्यावे लागते पण काही दिवस संकटांचे विस्मरण करून कुटुंबासमवेत दिवस घालवावे लागतात, असेही पवार म्हणाले आहेत.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी बाणेरमध्ये प्रतापराव पवारांचे निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंबीयांची भेट झाली. पवारांची दिवाळी एरवी बारामतीत गोविंद बागेत साजरी होते. दरम्यान, या कौटुंबीक सोहळ्यात शरद पवार आणि अजित पवारही दाखल झाले. कोर्टात राष्ट्रवादी कोणाची यावरून दावे प्रतिदावे करणारे पवार काका आणि पुतण्या पुन्हा एकदा कुटुंबात एकत्र आले.
पवार काका पुतण्या एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ नाही. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात एकमेकांच्या नजरेला नजरही न देणारे हे काका पुतणे पुण्यात 13 ऑगस्टला उद्योजक चोरडियांच्या निवासस्थानी एकत्र आले. ही बैठक तब्बल साडेतीन तास चालली.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार डेंग्यूमुळे आजारी आहेत. त्यामुळे अजित पवार कोणतेही शासकीय कार्यक्रम किंवा बैठकांपासून दूर आहेत. मात्र प्रतापरावांच्या घरी असलेल्या कार्यक्रमात अजित पवार आवर्जून उपस्थित होते. अर्थात या कार्यक्रमात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही हे सांगायला पवार कुटुंबातले कोणीच विसरले नाहीत.