नारायणगाव -कलिंगडची विक्री करीत असणाऱ्या ठिकाणी सात ते आठ लोक जमा करून त्यांना कलिंगडाची विक्री करणाऱ्या एका शेतकरऱ्यांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. समीर नामदेव पाचपुते (वय 30, रा. वडगाव कांदळी, ता. जुन्नर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्याद पोलीस नाईक प्रकाश जढर यांनी (दि.20) दिली आहे. नाशिक महामार्गावर पूनम हॉटेल चौक येथे दि. 20 रोजी दुपारी पाचपुते हा पिकअप गाडीमध्ये कलिंगडची विक्री केली. याठिकाणी सात ते आठ लोक जमा केले होते.