भाजप देशात द्वेषाचा विषाणू पसरवतय- सोनिया गांधी

नवी दिल्ली : कोरोना विषाणूसंदर्भात दिल्लीत आज काँग्रेस कार्यकारीची बैठक झाली. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजप पूर्वग्रह दूषित राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप देशात द्वेषाचा विषाणू पसरवत असून जातीय टेड निर्माण करीत असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.

याबाबत चिंता करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितलं. तसेच मला तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. देशात आपण कोरोनाशी एकत्रपणे लढण्याची गरज असताना भाजप जातीय द्वेष पसरवत आहे’ असं त्यांनी म्हटलं आहे. देशात लॉकडाऊनमुळे अनेकांनी रोजगार गमावला आहे. लॉकडूनमध्ये जवळपास १२ हजार कोटी लोकांचा रोगात गेला असून त्यांना सरकारने तात्काळ ७ हजार ५०० रुपये द्यावे अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.तसेच वैद्यकीय क्षेत्रांत अनेक कर्मचारी सुरक्षा किट शिवाय उपचार करीत आहेत.

अशा सर्व कोरोना वॉरिअर्सना सलाम केला पाहिजे असं त्यांनी बैठकीत म्हटले आहे. येत्या काही दिवसात बेरोजगारीच्या वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने शेतकरी, कामगार आणि बेरोजगारांच्या खात्यावर त्वरित ७ हजार ५०० रुपये जमा करावे अशा गांधी म्हणाल्या. तसेच पीपीई किट्सची गुणवत्ता बरोबर नाही. आम्ही सरकारला अनेक सूचना केल्या आहेत परंतु सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून कोरोनाबाधितांचा आकडा २१ हजार ३३९ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत ६८१ कोरोनाबाधित रुग्णांचा बळी गेला आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मोदी सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.