मराठमोळ्या रोलमध्ये कृति सेनन

“पानीपत’मध्ये कृति सेननने अगदी मराठमोळी व्यक्तिरेखा साकारली आहे. मराठमोळ्या आणि उत्तर भारतीय रोलची तयारी करणे आपल्यासाठी अवघड होते, असे ती म्हणाली. यापूर्वी दीपिका आणि प्रियांकाला हा अनुभव मिळाला आहे. पण कृति सेननने कधीही ऐतिहासिक सिनेमामध्ये काम केलेले नव्हते. त्यामुळे तिच्यासाठी हा अनुभव खूपच आगळा वेगळा होता. पण तिच्यासमोरचे आव्हान दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरने ओळखले आणि त्याने तिची चांगली तयारी करून घेतली.

तिच्या बोलण्यातले मराठीशी साधर्म्य असलेले उच्चार, कपड्यांची ठेवण, वागणे, बोलणे सारे काही त्याने तिला शिकवले. “पानीपत’सिनेमामध्ये पानीपतच्या तिसऱ्या युद्धामागील कहाणी मांडण्यात येणार आहे. यामध्ये कृति सेननला सदाशिव भाऊंची दुसरी पत्नी पार्वतीबाईचा रोल साकारायचा आहे. सदाशिव भाऊ पेशवे हे पानीपतच्या तिसऱ्या युद्धाच्या प्रसंगी मराठ्यांचे सेनापती होते. पानीपतच्या रणसंग्रामावर आतापर्यंत कादंबरी आणि नाटक मराठी प्रेक्षकांनी बघितले आहे. मात्र चित्रपट आणि तो ही हिंदीमध्ये करण्याचे धाडस कोणत्याच दिग्दर्शकाने केले नव्हते. पण “जोधा अकबर’, “मोहोंजदडो’ आणि “लगान’सारख्या ऐतिहासिक चित्रपट केलेल्या आशुतोष गोवारीकरने हे आव्हान स्वीकारले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.