जूनच्या मध्यापर्यंत सर्व रेल्वे आरक्षित; सुटी, लग्नसराईमुळे गर्दी

प्रवशांना आता तात्काळचाच पर्याय उपलब्ध

नगर: जून महिन्याच्या मध्यापर्यंतच्या सगळ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल झाल्यामुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांसाठी फक्त तात्काळ बुकिंग करण्याचाच पर्याय खुला राहिला आहे. यंदा सुटी आणि लग्नसराई यामुळे सर्व रेल्वे गाड्यांचे बुकिंग झाल्याचे समजते.

नगरच्या रेल्वे स्थानकातून लांब ,मध्यम व कमी पल्याच्या 32 पेक्षा जास्त गाड्या धावतात या सर्व गाड्यांचे बुकिंग फुल झाल्याने आता प्रवाशांना खासगी प्रवासी वाहतुकीने अथवा एस टीने प्रवास करावा लागत आहे.मे महिन्याच्या सुट्या असल्याने तसेच लग्नसराई जोरात असल्याने तसेच पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असल्याने रेल्वे गाड्यांचे बुकिंग संपले आहे. मे महिन्याच्या मध्यापासून ते जून महिन्याच्या मध्यापर्यंत परतीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

सहकुटुंब प्रवासाठी रेल्वेचा प्रवास हा आरामदायी असल्याने लोकांची प्रथम पसंती रेल्वेलाच असते त्यात आता कोटा सिस्टीम बंद झाल्याने रेल्वेचे बुकिंग चार महिने अगोदरच होत असल्याने. शिवाय इंटरनेट वरून कोठूनही तिकिटे आरक्षित करता येत असल्याने नियोजित प्रवास रेल्वेनेच केला जातो.

यंदा गोरखपूर -वाराणसी दिल्लीकडे जाणाऱ्या तसेच गाड्यांना तसेच कुलू,मनालीला पर्यटनासाठी पंजाब मधील अंबाला पर्यंत जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण संपले आहे. जशी तिकडे जाणाऱ्यांची गर्दी तशीच तिकडून येणाऱ्यांची गर्दी असते. दक्षिणे कडे जाण्यासाठी कर्नाटक एक्‍सप्रेस एव्हढी एकच दैनंदिन गाडी असल्याने तिलाही सहजासहजी आरक्षण मिळत नाही .बाकी दर आठवड्याला असणाऱ्या गाड्यांचीही तशीच परिस्थिती असते.

तात्काळ तिकिटांचे बुकिंग प्रवासाच्या आदल्या दिवशीच करावे लागते. त्यातही वातानुकूलित डब्यातील आरक्षण सकाळी 10 वाजता तर शयनयानचे तिकिट 11 वाजता सुरू केले जाते.त्यातही जशी तिकिटं शिल्लक असतील तेवढीच दिली जातात. लांबपल्याच्या गाड्यांमध्ये सध्या पुणे-पटना ,झेलम एक्‍सप्रेस, हावडा,गोवा, कर्नाटक या गाड्यांना जास्त गर्दी असते. त्यामुळे याव्यतिरिक्तच्या गाड्यांनाही सध्या गर्दी होत असून याही गाड्यांचे आरक्षण फुल झालेले आहे.


पुणे-पटना गाडीला सर्वाधिक गर्दी
सध्या पुणे -पटना या गाडीला सर्वाधिक गर्दी असून यागाडीचे 230 ते 300 वेटिंगनंबर असतो. त्याखालोखाल पुणे -हटिया ही गाडी आठवड्यातून दोन दिवस धावते तिलाही मोठी गर्दी असते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.