मुंबई – मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच आपल्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते. मराठी चित्रपटसृष्टीतील एक बिनधास्त अभिनेत्री म्हणून तिची ओळखल आहे. विविध धाटणीच्या भूमिका साकारत सईने आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मराठीच नव्हे तर सईने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.
आगामी काळात तिचा ‘पाँडीचेरी’ हा चित्रपट चाहत्यांसमोर येणार आहे. यातही सई हट के भूमिकेत आहे. हा संपूर्ण चित्रपटच एक वेगळा प्रयोग ठरणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांनी केलं आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुळकर्णी, गौरव घाटणेकर, तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
ती सतत आपले व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात पसंतदेखील केल्या जातात. सईने मराठी सोबतच हिंदीमध्येही पाऊल ठेवलं आहे. नुकताच ती “मिमी’ या चित्रपटामध्ये झळकली होती. यामध्ये मुख्य अभिनेत्रींच्या रूपात क्रिती सेनन होती. सईने क्रितीच्या मैत्रिणीची भूमिका अगदी उत्तम साकारली आहे.
सई, वैभव आणि अमृता यांच्या नात्याचा नवीन प्रवास आपल्यासमोर उलगडणार आहे.या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातील पहिला चित्रपट आहे, जो संपूर्ण स्मार्ट फोनवर चित्रित करण्यात आला आहे. चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.