पुणे: क्यूएनटी ऑप्टीमॅक्स न्यूट्रिशन व हेमंत पाटील क्रिकेट अकादमी यांच्या वतीने आयोजित सहारा क्रिकेट करंडक 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत दिवेकर क्रिकेट अकादमी संघाने 22 यार्डस संघाचा 8 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.
या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना अर्जुन सोनार 12, अथर्व निमजे नाबाद 10, संजीत लाहिरी नाबाद 12 यांच्या कामगिरीच्या जोरावर 22 यार्डस संघाने 20 षटकात 5 बाद 77 धावा केल्या.
हे आव्हान रिषभ कुलकर्णी 35, हर्ष बारमुख नाबाद 13, चंद्रहास भालघरे नाबाद 9 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर दिवेकर अकादमी संघाने 20 षटकात 2 बाद 79 धावा करून विजय मिळवून दिला.
स्पर्धेचे उद्घाटन हेमंत कांबळे आणि महाराष्ट्र रणजीपटू व सहारा क्रिकेट अकादमीचे संचालक मानसिंग निगडे यांच्या हस्ते करण्यात आले.