काठमांडू : तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरूष संघा पाठोपाठ भारतीय महिला व्हाॅलीबॉल संघाने देखील विजेतेपद पटकावत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत व्हाॅलीबाॅलच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने नेपाळचा २५-१७,२३-२५, २१-२५,२५-२०,१५-६ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेत श्रीलंकेच्या महिला संघाने कांस्यपदक पटकाविले.
Indian Women’s volleyball team clinch GOLD 🥇 medal at 13th #SouthAsianGames;
Defeats host Nepal in a thrilling final by 3-2 Kathmandu #Nepal pic.twitter.com/0P8edZTFpV— Doordarshan Sports (@ddsportschannel) December 3, 2019
दरम्यान, रविवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय महिलांनी मालदीवच्या संघाचा २५-१४, २५-६, २५-१७ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.