जोहान्सबर्ग : इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या चार कसोटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेतील चौथ्या सामन्यातील पहिल्या डावात सर्वबाद ४०० अशी मजल मारली. त्यानंतर प्रत्युत्तरात दुस-या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४१.५ षटकांत ६ बाद ८८ धावा केल्या असून ते अजूनही ३१२ धावांनी पिछाडीवर आहेत.
Stumps | SA: 88-6
Nortje is out, caught in the slip cordon.
Stumps have been called.
De Kock finishes unbeaten on 32
South Africa trail by 312 runs in their first innings.#SAvENG pic.twitter.com/BJu6erYYvT
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 25, 2020
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जक क्राॅल ६६, जो रूट ५९, आॅली पोप ५६, डोमिनिक सिबली ४४, स्टुअर्ट ब्राॅड ४३ आणि मार्क वूडच्या नाबाद ३५ धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ९८.२ षटकांत सर्वबाद ४०० धावा केल्या. द.आफ्रिकेकडून गोलंदाजीत ऐनरीक नाॅर्टजेने सर्वाधिक ५, ब्यूरन हेड्रिक्संने १, वरनाॅन फिलेंडर आणि डेन पॅटरसन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
End of Innings | ENG: 400
That’s a wrap.
The Proteas have bowled out England.
Nortje led the attack and finished with career-best figures of 5-110
Philander finished with 2-50
Paterson got 2-86Elgar and Malan will be out to bat shortly.#ProteaFire #SAvENG pic.twitter.com/qCeQJbtTxV
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 25, 2020
प्रत्युत्तरात द. आफ्रिकेने डीन एल्गर (२६), पीटर मालन ज्यु. (१५), रॅसी वॅन डर डुसेन (०), फाफ डू प्लेसी (३), टेम्बा बवुमा (६) आणि ऐनरिक नाॅर्टजे (६) यांच्या विकेट गमावत पहिल्या डावात दुस-या दिवसअखेर ६ बाद ८८ अशा धावा केल्या आहे. इंग्लंडकडून गोलंदाजीत मार्क वूडने ३ तर सॅम करन, क्रिस वोक्स आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी १ गडी बाद केला आहे. ऐनरिक नाॅर्टजे बाद झाल्यानंतर दुस-या दिवसाचा खेळ थांबविण्यात आला. खेळ थांबला तेव्हा खेळपट्टीवर क्विंटन डी काॅक नाबाद ३२ धावांवर खेळत होता.