नाशिक – सप्तशृंग गडावरील घाट रस्तात आज सकाळी एस. टी. बस कोसळून एकजण ठार झाला असून 25 प्रवासी जखमी झाले आहेत. आज सकाळी पावणे सातच्या सुमारास घडला. मिळलेल्या माहितीनुसार, खामगाव डेपोची मुक्कामी बस अपघात ग्रस्त झाली. दरम्यान, जखमी प्रवाशांवर वणी येथे उपचार सुरू आहेत. पालकमंत्री दादा भुसे हे मालेगावहून घटनास्थळी रवाना झाले आहेत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून काल सकाळी 8.30 वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेने रवाना झाली. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता. वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असलेल्या बसला मोठा अपघात झाला असून बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे. या घटनेत २५ प्रवासी जखमी असल्याचे समजते आहे.
सध्या बसमध्ये जवळपास २५ पेक्षा जास्त प्रवासी असल्याचे समजते आहे. दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनेची माहिती घेत ते सप्तशृंगी गडाकडे रवाना झाले आहेत. या घटनेत २५ लोक जखमी आहेत तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बस थेट 400 फूट खाली कोसळल्याने हा मोठा अपघात असल्याचे बोलले जात आहे.