किव्ह – रशियाने केलेल्या क्षेपणास्त्रांच्या प्रचंड भडीमारामुळे युक्रेनमधील 80 टक्के नागरिकांचा वीज आणि पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. युक्रेनच्या उत्तरेकडील खारकिव्ह शहर आणि मध्य युक्रेनमधील चेरकोसी भागातील वीज आणि पाणी पुरवठा सोमवारी दिवसभरासाठी खंडीत झाला होता.
काळ्या समुद्रात रशियाच्या जहाजांवर युक्रेनने ड्रोन हल्ला केल्याचा आरोप रशियाने केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने हा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. युक्रेनने मात्र ड्रोनव हल्ल्याचा आरोप फेटाळला आहे.
Israel’s Political Crisis : इस्रायलमध्ये ‘या’ कारणामुळे पुन्हा एकदा निवडणुका
राजधानी किव्हमदील लाडे तीन लाख नागरिकांचा वीज पुरवठा खंडीत झाला असून वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी आपत्कालिन व्यवस्थेंतर्गत प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दक्षिणेकडील झापोरिझ्झियामध्येही क्षेपणास्त्रांचे हल्ले झाल्याचे वृत्त आहे.