Russia space mission – आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहीमेवरील ३ अंतराळवीरांना अवकाश स्थानकावर घेऊन जाण्यासाठी नियोजित असलेली अंतराळ मोहीम प्रक्षेपणाच्या अवघ्या २० सेकंज आगोदर रद्द करण्यात आली आहे.
रशियाची अंतराळ संस्था रिस्कोसमोसने याबाबतची माहीती दिली आहे. या अंतराळ यानाती सर्व अंतराळवीर सुखरुप असल्याचे या अंतराळ संस्थेने स्पष्ट केले आहे.
रशियाच्या सोयुझ रॉकेटच्या माध्यमातून नासा या अमेरिकेच्या अंतराळ संस्तेचे ट्रेसी डेसन, रशियाच्या रिस्कोसमोसचे ओलेक नोवित्सकी आणि बेलारुसच्या मरीना वासिलोस्कीया या तिघांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नेले जाणार होते.
रशियाने भाडेतत्वावर घेतलेल्या कझाकस्तानमधील बाल्कोनूर अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून या यानाचे प्रक्षेपण केले जाणार होते. मात्र स्वयंचलित सुरक्षा प्रणालीद्वारे प्रक्षेपण रद्द करण्यात आले. तात्काळ कोणतेही कारण दिले गेले नाही, परंतु अंतराळयानातील सर्व सदस्य सुरक्षित आहेत, असे नासाने सांगितले.