Vasant more । Lok Sabha Election 2024 : मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी मनसे पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र अद्याप त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत स्पष्ट सांगितलेले नाही. मात्र मागील काही दिवसांपासून वसंत मोरे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगत आहेत.आजही ते निवडणूक लढवण्यावर ठाम असून ‘मी एकला चलो रे’च्या भूमिकेवर ठाम आहे, असे विधान वसंत मोरे यांनी केले.
पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून काँग्रेसचे विद्यामान आमदार रविंद्र धंगेकर रिंगणात उतरु शकतात. त्यामुळे वसंत मोरे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणे कठीण आहे. तर महायुतीने पुण्याची उमेदवारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना जाहीर केली.
त्यांचा प्रचार देखील सुरू झाला आहे. तसेच ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचेही म्हंटले जात आहे. या पार्श्वभूमीवर मोरे यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘..तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते, बघतोच मी…’, असे म्हणत मोरे यांनी भाजप नेत्यांना डिवचले आहे.
तर आज वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, कुठल्या पक्षात जाण्यासाठी मी मनसे सोडलेली नाही. मी सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटलो आहे. त्यानंतर मी लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. मी एकला चलो रेच्या भूमिकेत आहे. मी अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.
मध्यंतरीच्या काळात मी शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेतल्या. पुणे शहरात कशाप्रकारे मोट बांधली जाऊ शकते हे मी सर्वांना समजावून सांगितलं. मात्र यावेळी मी निवडणूक लढवणारचं हे ठरवलं होतं. त्यामुळे आता देखील मी अपक्ष निवडणूक लढण्यास तयार आहे, असं वसंत मोरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “मी एकला चलो रेच्या भूमिकेत आहे. मी अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. मध्यंतरीच्या काळात मी शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेतल्या. पुणे शहरात कशाप्रकारे मोट बांधली जाऊ शकते हे मी सर्वांना समजावून सांगितलं. मात्र यावेळी मी निवडणूक लढवणारचं हे ठरवलं होतं. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढण्याची माझी तयारी आहे.,” असं वसंत मोरे म्हणाले