Narendra Modi – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील वर्षी रशिया भेटीचे निमंत्रण दिले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी रशियाच्या राष्ट्रपती भवन क्रेमलिन येथे पुतीन यांची भेट घेतली.
यादरम्यान पुतिन यांनी जयशंकर यांना सांगितले की, ‘आमचे मित्र पंतप्रधान मोदींना रशियामध्ये पाहून आम्हाला आनंद होईल. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशियाच्या दौऱ्यावर आले आहेत.’
रशियाच्या पाच दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी तत्पूर्वी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांची भेट घेतली. लावरोव यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना जयशंकर म्हणाले की, पुढील वर्षी होणाऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट होईल असा मला विश्वास आहे. यापूर्वी एस जयशंकर म्हणाले की, दोन्ही नेते सतत संपर्कात आहेत.
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
“आज संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली,” असे जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून वैयक्तिक संदेश दिला. उपपंतप्रधान डेनिस मँतुरोव आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्याशी झालेल्या माझ्या चर्चेची अध्यक्ष पुतिन यांना माहिती दिली. उभय देशांमधील संबंध पुढे नेण्यासाठी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे कौतुक केले.
आतापर्यंत भारत आणि रशियामध्ये 21 वार्षिक शिखर परिषदा आळीपाळीने आयोजित केल्या गेल्या आहेत. शेवटची शिखर परिषद डिसेंबर २०२१ मध्ये नवी दिल्ली येथे झाली होती. रशिया आणि भारत यांच्यातील व्यापार विशेषत: कच्चे तेल आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात वाढत आहे, असेही पुतीन म्हणाले. ते म्हणाले, “आमचा व्यवसाय सलग दुसऱ्या वर्षी स्थिर गतीने वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढीचा दर अधिक आहे.