कीव – रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. आज युद्धाचा तिसरा दिवस आहे. या युद्धादरम्यान युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले आहे. युक्रेनवर सातत्याने हवाई हल्ले होत आहेत. रशियाने केलेल्या स्फोटात आतापर्यंत शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.
तीन दिवसांपासून युद्ध सुरू आहे; पण बलाढ्य रशियासमोर युक्रेन हार मानायला तयार नाही. युक्रेन रशियासोबत लढत असल्याने युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेन्स्की यांचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे.
https://twitter.com/_Hyper_07_/status/1497397113142972417
व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी युद्ध संपवावे असे आवाहन ट्वीटरद्वारे केले आहे. मात्र युद्ध थांबेर्यंत आपण रशियाविरोधात लढणार असल्याची भूमिका घेतली आहे. तसेच आपण देश सोडून जाणार नसून आपल्या कुटुंबासह राजधानी कीवमध्येच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही देशाचे रक्षण करत आहोत ,आमच्या नागरिकांना एकटे सोडून कुठेही जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.
सध्या झेलेन्स्की यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यांचे सैनिका वेशातही काही फोटो व्हायरल होत आहेत. झेलेन्स्की सध्याच्या या कठीण काळात देशवासीयांसाठी आणि सैन्यासाठी हिरो ठरले आहेत. सोशल मीडियावरदेखील त्यांच्या भूमिकेचे आणि हिमतीचे नेटकरी कौतुक करत आहेत.