किव्ह, दि. 6-किव्ह शहराच्या पश्चिम आणि वायव्य भागात रविवार्री जोरदार तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. या स्फोटांचे आवाज शहरातून आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातूनही ऐकू येत होते. इरपिन या उपनगरातून शहरता येताना असणाऱ्या तपासणी नाक्यावर दोन तोफगोळे आदळले. त्यात हा नाका उद्ध्वस्त झाला. या हल्ल्यात दोन लहान मुलांसह तीन जण मरण पावल्याचे युक्रेनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
इरफिन या गावात या माऱ्याने प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचे व्हिडिओ युरोपात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. रशियन फोजांनी होस्टोमेल आणि बुचा या शहरांवर ताबा मिळवल्याचे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार अलेस्की अरेस्टोव्हिच यांनी शनीवारी मान्य केले.
रशियन सैन्यांने अनेक मुलांना जखमी केले असून त्यांना हलवण्यास मज्जाव केला जात आहे. बुचा आणि इरपिनमधून मानवतावादी कॅरिडोर करण्याची विनंती राज्य प्रशासनाने अनेकदा केली आहे. मात्र, रशिया या विनंतीकडे लक्ष देण्यास तयार नाही. मानवतेच्या दृष्टीकोनातून आणि नैतिक मुल्यासंसाठी ही परवानगी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तर युक्रेनच्या आरोग्य मंत्रालयाने अनेक मुलांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.